समंथा रूथ प्रभू अभिनयासोबतच तिच्या फिरण्याच्या आवडीमुळे देखील नेहमी चर्चेत असते. नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर आता अभिनेत्री स्वतःला भरपूर वेळ देत आहे.
‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याने समंथाच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळवून दिली आहे.
अभिनेता नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर समंथा प्रचंड चर्चेत आली होती. आयुष्यातील एका नव्या वळणानंतर आता समंथा स्वतःला अधिकाधिक वेळ देत आहे. दरम्यान अभिनेत्री तिची फिरण्याची आवड जोपासत आहे.
समंथा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर ट्रॅव्हल स्टोरी अपडेट करत असते. तिने शूट केलेल्या जागा अतिशय आर्कषक आणि निसर्ग सौंदर्याने समृद्ध अशा असतात.
नुकतीच समंथाने केरळमधील अथिरप्पिल्ली धबधब्याला भेट दिली आणि चाहत्यांसाठी तिच्या इंस्टाग्रामवर याचे आकर्षक फोटोसुध्दा शेअर केले आहेत.
अनेक चित्रपटात हा धबधबा दिसला आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटातील गाण्यानंतर याला लोक ‘बाहुबली धबधबा’ म्हणून ओळखू लागले.