दुबईतील बुर्ज खलिफा या ईमारतीवर वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई केली जाते.

नुकतेच 83 या चित्रपटाचे कलाकार बुर्ज खलिफावर झळकले.

बुर्ज खलिफावर 83 चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला.

83 या चित्रपटामध्ये क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंहने साकारली आहे

अभिनेत्री दीपिका पदुकोणने 83 चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारली आहे.

कबीर खान दिग्दर्शित, '83' चित्रपट भारतीय क्रिकेट संघाच्या कथेवर आधारित आहे.

चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत.

हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

दीपिका या चित्रपटाची सहनिर्माती आहे.