अभिनेता रणवीर सिंहचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणवीर सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. रणवीरनं नुकतेच त्याच्या ऑल व्हाईट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. रणवीरच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. रणवीरनं व्हाईट पँट, व्हाईट कोट आणि व्हाईट टी-शर्ट अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. रणवीरच्या या ऑल व्हाईट लूकचं अनेक जण कौतुक करत आहेत. या फोटोला रणवीरनं व्हाईट हार्ट इमोजीचं कॅप्शन दिलं आहे. रणवीरच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रणवीरचा चाहता वर्ग मोठा आहे. रणवीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.