अभिनेता उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी स्वानंदी टिकेकर ही देखील अभिनेत्री आहे.



स्वानंदीनं अनेक अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.



दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे स्वानंदीला विशेष लोकप्रियता मिळाली.



सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वानंदी टिकेकरनं तिच्या बालपणाबद्दल तसेच तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'माझे लहानपणी खूप लाड झाले. माझ्या आई वडिलांनी मला हट्ट करायची संधीच दिली नाही. त्यांनी मला प्रत्येक गोष्टी दिल्या.'



पुढे स्वानंदीनं सांगितलं, 'बाबा मुंबईमध्ये वेगळीकडे राहतात. मी मुंबईमध्ये कामानिमित्त वेगळीकडे राहते आणि आई पुण्यात असते. आम्ही तीन-चार दिवस एकमेकांसोबत बोलत नाही पण आईनी एक फोन केला की मी आणि बाबा लगेच तिथे जातो.'



स्वानंदीनं पुढे सांगितलं, 'मी गाणं कधीच शिकले नाही. मी शाळेत असताना गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. नाटकामध्ये देखील काम करायचे.'



स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे.



तसेच तिनं अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केलं आहे.



स्वानंदीनं तिच्या करिअरबाबत सांगितलं, 'मी न्युयॉर्क युनिव्हर्सिटमध्ये अप्लाय केलं होतं. तिथे मला अॅडमिशन मिळाली. मी तेव्हा ‘प्राईजटॅग’ नावाचं नाटक करत होते. मी आई-बाबांशी याबाबत चर्चा केली.'



'आई-बाबांनी मला सांगितलं, आम्ही देखील कलाकार आहोत. आम्ही आयुष्यभर जे केलंय त्यामधून आम्हाला आनंद मिळाला आणि आम्ही लोकांना आनंद दिला आहे. जर तुझ्याकडे हा आनंद वाटण्याचा ऑप्शन असेल तर तू का सोडावा? मग मी खूप चांगला जॉब, खूप पैसे कमावण्याची संधी सोडून संघर्ष करुन अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.' असंही तिनं सांगितलं.