ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



या प्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.



वर्षा गायकवाड म्हणाल्या की, माझं सीईओंशी बोलणं झालं आहे, त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी,



त्यांना परदेशात पाठवायचं आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डिसले सरांसदर्भात मी स्वामींशी बोलले आहे.



त्यांना रीतसर परवानगी दिली जाईल. डिसले यांनी प्रोसीजर प्रमाणं अर्ज दिला नव्हता. आता त्यांना प्रक्रियेप्रमाणं कार्यवाही करत परदेशी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.



डिसले यांना परवानगी देण्यासंदर्भात मी निर्देश दिले आहेत.



तसेच डिसलेंवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.



डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा