महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत स्थान मिळवले आहे. सध्या आजारपणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सार्वजनिक कार्य़क्रमांना हजर राहत नसले तरी त्यांची लोकप्रियता कायम आहे. देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉपच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश झाला आहे. इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे प्रत्येक राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर 43 टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या नऊ मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.