'मिस्टर परफेक्शनिस्ट' अशी ओळख असणारा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतो.



आज आमिरचा 58 वा वाढदिवस आहे. आमिरने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.



आमिरचा जन्म 14 मार्च 1965 रोजी मुंबईमध्ये झाला. आमिरने 1973 मध्ये 'यादों की बारात' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं.



आमिरने अभिनयक्षेत्रात काम करावं, असं त्याच्या वडिलांना वाटत नव्हतं. पण आमिरने अवन्तर नावाच्या थिएटर ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.



'कयामत से कयामत तक' या चित्रपटात त्याने पहिल्यांदा हिरोची भूमिका साकारली.



आमिरला बालपणी टेनिस खेळायला खूप आवडत होते. त्याला टेनिस प्लेअर व्हायचे होते. तो शाळेत असताना टेनिस चांगला खेळायचा. त्याने शाळेत असताना राज्यस्तरीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला होता.



'कयामत से कयामत तक' या चित्रपटातील आमिरच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटाचं बजेट कमी होतं.



आमिरने स्वत:च या चित्रपटाचे पोस्टर रिक्षा आणि बसच्या मागे लावण्याचे काम केले. काही दिवसांपूर्वी आमिरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आमिर हा रिक्षाच्या मागे चित्रपटाचे पोस्टर लावताना दिसत होता.



आमिर हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. मन, इश्क, गुलाम, फना, तारे जमीन पर या चित्रपटांमध्ये आमिरने काम केलं.



आमिरच्या लगान, दंगल, पीके आणि थ्री इडियट्स या चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.