महाशिवरात्र उत्सवाचे औचित्य साधून सिंधुदुर्गातील युवा चित्रकार अल्पेश घारे याने आपल्या कलेच्या माध्यमातून खवणे समुद्र किनाऱ्यावर वाळू आणि रांगोळीचा वापर करून महादेवाची रांगोळी साकारली आहे.



ही रांगोळी 25 फुट आकाराची आहे.



निसर्गरम्य अश्या वेंगुर्ले तालुक्यातील खवणे समुद्र किनाऱ्यावर अल्पेशने समुद्र किनाऱ्यावर ही रांगोळी साकारली आहे.



दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नातून समुद्र किनाऱ्यावर ही रांगोळी काढण्यात आली.



फक्त रांगोळी आणि वाळूचा उपयोग या चित्रात केला आहे.



महाशिवरात्रीचं औचित्य साधून महादेवाच हे रूप रांगोळीच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्यावर साकारण्यात आलं आहे.



चित्रकार अल्पेश घारे याने ही रांगोळी काढली आहे.