महाशिवरात्रीचा सण देशभरात आनंदाने आणि भक्तिभावाने सर्वत्र साजरा केला जात आहे.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून सिंधुदुर्गातील चित्रकार रविराज चिपकर यांनी वेंगुर्लेतील आरवली सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर वाळूच्या सहाय्याने वाळूशिल्प साकारले आहे.
दीड ते दोन टनाच्या वाळूच्या सहाय्याने शंकराचे मोहक रूप समुद्र किनाऱ्यावर साकारले आहे.
हे वाळूशिल्प साकारण्यासाठी दोन तासांच्या अवधी लागला.
रविराज चिपकर हे नेहमीच सामाजिक विषयांवर वाळूशिल्प साकारत असतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं वाळूशिल्पकार म्हणून नावलौकिक आहे. महाशिवरात्री निमित्ताने आरवली सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्प साकारून अनोख्या पद्धतीने सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.