आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली.
रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या आऊट-फिटनं अनेकांचे लक्ष वेधलं पण लग्नाआधी झालेल्या मेहंदीच्या कार्यक्रमाला आलियानं घतलेल्या लेहंग्याची देखील सोशल मीडियवर चर्चा सुरू आहे.
रिपोर्टनुसार, आलियाचा मेहंदीच्या कार्यक्रमातील लेहंगा तयार करण्यासाठी 3000 तास म्हणजेच जवळपास पाच महिने लागले.
मेहंदीसाठी आलियानं परिधान केलेला हा लेहंगा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या कलेक्शनमधील आहे.
आलियाचा हा लेहंगा काश्मिरी आणि चिकनधारी धाग्याने विणलेले आहे
मिजवान वेलफेअर सोसायटीच्या महिलांनी लेहंग्यावर नक्षीकाम केले आहे. यात बनारसी ब्रोकेड, जॅकवर्ड, बांधणी आणि रॉ-सिल्क नॉट्सचा समावेश आहे.
आलियाच्या या लेहंग्याच्या ब्लाऊजवर सोन्या-चांदीची जरी आहे.
आलियाचा हा लेहंगा डिझाइन केलेल्या डिझायनरनं म्हणजेच मनीष मल्होत्रानं सोशल मीडियावर आलियाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.