बॉलिवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नबंधनात अडकणार आहेत. आलियापूर्वी रणबीरने अनेक सुंदरींना डेट केले आहे. आलियापूर्वी त्याने कोणाला डेट केले आहे, ते जाणून घेऊया... ‘रॉकस्टार’च्या शूटिंगदरम्यान रणबीर कपूरच्या नर्गिस फाखरीसोबतच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. पण दोघांनीही त्याला दुजोरा दिला नव्हता. रणबीर कपूरने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात दीपिका पदुकोणला डेट केले होते. दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. कॉलेजच्या दिवसांमध्ये रणबीर कपूरने अवंतिका मलिकला डेट केले होते. रणबीरचं अवंतिकावर क्रश होतं. पण अवंतिकाला इम्रान खान आवडला. रणबीर आणि आलिया जवळपास 6 वर्षे डेट करत होते. कतरिना आणि रणबीरच्या ब्रेकअपची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता.