आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत.

रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.

आरके हाऊसमध्ये उद्या आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांनी मेहेंदीसोहळ्यानंतर एका मुलाखतीत लग्नासंदर्भात भाष्य केले आहे.

आलिया आणि रणबीरचे उद्या म्हणजेच 14 एप्रिलला लग्न होणार आहे.

करिश्मा कपूर, करीना कपूर, करण जोहरसह अनेक सेलिब्रिटींनी रणबीर-आलियाच्या प्री वेडिंग फंक्शन्सला हजेरी लावली होती.

आलिया आणि रणबीर लग्नानंतर लगेचच आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

आलिया-रणबीर पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहेत.

आलिया भट्ट तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जीचा पोशाख परिधान करणार आहे.