बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.

14 एप्रिल 2022 रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघे लग्नबंधनात अडकले.

सध्या आलिया आणि रणबीरचा बंगाली वेशभूषेतील फोटो व्हायरल होतो आहे.

कोलकातातील आलिया-रणबीरच्या चाहत्यांनी त्यांचे लग्न बंगाली रितीरिवाजांनुसार लावले आहे.

चाहत्यांनी पुतळ्यांना आलिया आणि रणबीरचा फोटो लाऊन त्यांचं बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न लावलं आहे.

बंगाली वेशभूषेतील आलिया आणि रणबीरच्या पुतळ्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मुंबईतल्या वांद्रे येथील 'वास्तू' बंगल्यावर आलिया-रणबीरचा लग्नसोहळा काल पार पडला.

रालियाच्या लग्नसोहळ्यात कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी उपस्थित होती.