ज्युनिअर एबी डिव्हिलियर्सच्या नावानं प्रसिद्ध मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसनं मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलंय.
या हंगामात त्यानं आक्रमक फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसनं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदापर्ण केलं आहे. या सामन्यात त्यानं 19 चेंडूत 29 धावा कुटल्या.
पंजाबविरुद्ध सामन्यात त्यानं 25 बॉलमध्ये 49 धावांची वादळी खेळी केली होती. ज्यात पाच षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता.
ब्रेविसची एबी डिव्हिलियर्ससारखी फलंदाजी चर्चेचा विषय ठरत आहे.
डेवाल्ड ब्रेविस हा 18 वर्षाचा असून लिंडा मारी अंस त्याच्या गर्लफ्रेन्डचं नाव आहे. लिंडी नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून सध्या ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
ब्रेविस आणि लेंडी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सनं त्याला तीन कोटीमध्ये विकत घेतलं होतं. त्याची मूळ किंमत 20 लाख होती. त्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जच्या संघानं देखील उस्तुकता दाखवली होती.
डेवाल्ड ब्रेविस यांचा जन्म 29 एप्रिल 2003 रोजी जोहान्सबर्ग येथे झालाय.