अभिनेता बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरचा 40 वा वाढदिवस आहे. त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. रणबीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याचे हिट चित्रपट..



2007 मध्ये रिलीज झालेल्या सांवरिया या चित्रपटामधून रणबीरनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये रणबीरसोबत सोनम कपूरनं देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील 'जबसे तेरे नैना' या गाण्यातील रणबीरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.



रणबीरचा वेक अप सीड हा चित्रपट 2009 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला अनेकांची पसंती मिळाली.



बर्फी हा चित्रपट रणबीरच्या करिअरमधील सर्वात चांगला चित्रपट आहे, असं अनेकांचे मत आहे. या चित्रपटातील रणबीरच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता.



ये जवानी है दिवानी हा चित्रपट अनेक तरुणांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील रणबीरच्या बनी या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रणबीर आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले.



2011 मध्ये रिलीज झालेला रणबीरचा रॉकस्टार हा चित्रपट देखील हिट ठरला.



2009 मध्ये रिलीज झालेल्या रॉकेट सिंह या चित्रपटात रणबीरनं सेल्समनची भूमिका साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही, पण रणबीरच्या अभिनयामुळे हा चित्रपट चर्चेत होता.



2018 मध्ये रिलीज झालेल्या संजू या चित्रपटामध्ये अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीरनं साकारली. रणबीर हा या चित्रपटामध्ये हुबेहूब संजय दत्त सारखा दिसतो, असं अनेकांचे मत होते.



सध्या रणबीरच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाची चर्चा सगळीकडे होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.



रणबीरचा चाहता वर्ग मोठा आहे.