अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते रकुल प्रीत सिंह तिच्या नव्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे यामध्ये रकुल प्रीतचा 'गुलाबो' अंदाज पाहायला मिळतोय रकुलने प्रिटेंड टॉप गुलाबी टॉपसोबत गुलाबी पँटची जोड दिली आहे यासह तिने न्यूड मेकअप आणि हाफ पोनी हेअर स्टाईल केली आहे रकुल प्रीत सिंह लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे सध्या रकुल प्रीत तिच्या आगामी ‘रनवे 34’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे या चित्रपटामध्ये रकुल अजय देवगण, अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे रकुल प्रीत सिंह बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीलही एक प्रसिद्ध नाव आहे सोशल मीडियावर रकुल प्रीत सिंह कधी तिच्या पारंपारिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवतारात फोटो शेअर करत चाहत्यांसोबत जोडलेली राहते