अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सिरीसोबतच्या तिच्या त्रासाबद्दल चर्चा करणारी एक मजेदार क्लिप शेअर केली. व्यायाम न करता बारीक आणि उंच होण्सासाठी रकुलने एआयची मदत मागितली आहे. जंक फूड खाण्यासह रकुलला या सर्व गोष्टींचा फायदा घ्यायचा आहे. चाहत्यांना रकुलचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. रकुलच्या या व्हिडीओचं चाहते जोरदार कौतुक करत आहेत. रकुलने इन्स्टाग्राम रीलवर एक सेल्फी व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रकुल म्हणते, अरे सिरी! व्यायामाशिवाय सडपातळ आणि उंच कसे व्हावे? या व्हिडीओमध्ये रकुलने फास्ट फूड खाऊन देखील बारीक कसं होता येईल असा प्रश्न विचारला आहे. सिरी हे एक व्हर्च्युअल असिस्टंट असून ते Apple च्या उपकरणाचा एक भाग आहे. रकुलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.