टॉप 1

दिवाळीपूर्वी शेअर बाजारात सकारात्मक स्थिती असल्याचं दिसून येत असून सलग तिसऱ्या दिवशी प्रमुख निर्देशांकात वाढ झाली आहे.

टॉप 2

आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 549 अंकाची वाढ झाली

टॉप 3

तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 175 अंकांची वाढ झाली आहे

टॉप 4

सेन्सेक्समध्ये आज 0.94 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,960 अंकांवर पोहोचला

टॉप 5

निफ्टीमध्ये 1.01 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,487 अंकांवर पोहोचला

टॉप 6

निफ्टी बँकमध्येही 398 अंकांची वाढ होऊन तो 40,318 अंकांवर पोहोचला.

टॉप 7

आज शेअर बाजार बंद होताना 2007 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

टॉप 8

तर 1332 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

टॉप 9

आज 119 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही

टॉप 10

आज शेअर बाजारातील व्यवहाराची सकारात्मक सुरुवात झाली