वर्षा पर्यटनासाठी कोकणात जात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.



पावसाळा सुरु झाला की पावसाळी पर्यटनासाठी आपसूकच पावले धबधब्यांकडे वळतात.



असाच कोकणात राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.



यात स्वतःला डुंबून घेत हे तुषार अंगावर झेलत पर्यटनाचा आनंद घेण्याची आतुरता अनेकांना असते.



कोकणात पावसाने दमदार लावली असून कोकणच्या सौंदर्यात भर पडली आहे.



चारही बाजूला हिरवळ त्यात दाट धुके आणि ओसंडून वाहणारे धबधबे जणू स्वर्गची अनुभूती मिळते.



दीडशे ते दोनशे फुटांवरुन कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाला आहे.



फेसाळणारा धबधब्याखाली आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे हजेरी लावतात.



तिवंडामाळ गावातून पाच किलोमीटर अंतरावर असणारा हा फेसाळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे



Thanks for Reading. UP NEXT

अभिनेत्री दीपिका सिंहचा स्टनिंग लूक

View next story