देशातील कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना देशातील कोरोना रुग्णांमध्ये मात्र किंचित घट पाहायला मिळाली आहे गेल्या 24 तासांमध्ये नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तर, सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे सोमवारी दिवसभरात 11 हजार 793 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे भारतात गेल्या 24 तासात 11,793 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 34 लाख 18 हजार 839 झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 700 वर पोहोचली आहे गेल्या 24 तासांत 27 रुग्णांच्या मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 5 लाख 25 हजार 47 वर पोहोचली आहे