‘माझी तुझी रेशीम गाठ’ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.



प्रार्थनाच्या सोशल मीडियावरील पोस्टला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.



प्रार्थनानं नुकतेच ग्लॅमरस लूकमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.



व्हाईट पँट आणि ब्लू टॉप अशा लूकमधील फोटो प्रार्थनानं शेअर केले आहेत.



प्रार्थनानं या फोटोला My favourite ones असं कॅप्शन दिलं आहे.



नेटकऱ्यांनी प्रार्थनाच्या या फोटोवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



प्रार्थना तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



सध्या ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेमधून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.



कॉफी आणि बरंच काही, मितवा या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रार्थनाला विशेष लोकप्रियता मिळाली.



प्रार्थनाचा चाहता वर्ग मोठा आहे.