'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेच. धनश्री नेहमीच तिच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने कुटूंबासह शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी धनश्रीने आपल्या बाळाचं बोरन्हाण केलं, ज्याचे फोटो तिने पोस्ट केले आहेत. काळी कपडे आणि त्यावर हलव्याचे दागिने घालून धनश्रीचा मुलगा खूप क्युट दिसत आहे. धनश्रीच्या गोंडस बाळाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. (Photo Instagramed by @KadgaonkarDhanashri/Instagram) (Photo Instagramed by @KadgaonkarDhanashri/Instagram)