राजस्थानमधील अलवर येथे सरिस्काच्या जंगलात भीषण आग लागली आहे. आग जंगलात पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. आग सुमारे 20 किमी जंगलात पसरली असून लोकवस्तीच्या दिशेने सरकत आहे. या वनपरिक्षेत्रात सुमारे 27 वाघांव्यतिरिक्त सांबर, चितळ यांसह हजारो प्राणी वास्तव्य करतात. गेल्या दोन दिवसांपासून लष्कराचे जवान हेलिकॉप्टरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मार्च महिना सुरू होताच अलवरचे तापमान 39 अंश होते, मात्र आगीनंतर डोंगराळ भागामुळे तापमान 50 अंशांवर पोहोचले आहे.