अकोल्यात पावसामुळे रेल गावात घरावरील पत्रे उडाले तर विद्युत खांब व झाड उन्मळून पडले. तासभर पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती. जून महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी मान्सून हजेरी लावली नाही. रेल गावात काल वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी गारपीटही झाली. सोसाट्याचा वारा सुटल्याने काही घरांवरील टिनपत्रे उडाली. एक विद्युत खांब कोसळला तसेच जिल्हा परिषद शाळेची टिनपत्रे उडाली शाळेतील निंबाचे झाड उन्मळून पडले. या नुकसानीमुळे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला होता. अद्याप गावात कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नव्हती.