इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाला आणखी एक धक्का देणारी माहिती समोर आलीय.



न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.



कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.



न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी याला दुजोरा दिला आहे.



केन विल्यमसनच्या जागी हमिश रदरफोर्डचा संघात समावेश करण्यात आलाय.



विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व करेल.



न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.



लॉर्ड्स कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर न्यूझीलंडचा संघ 0-1 नं पिछाडीवर आहे.



इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून म्हणजेच 10 जूनपासून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे.



या सामन्यापूर्वी केन विल्यमसनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय.