भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात ऋषभ पंतनं एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
केएल राहुलच्या दुखापतीनंतर ऋषभ पंतकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.
भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणारा ऋषभ पंत हा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरलाय.
सर्वात कमी वयात भारताचा कर्णधार बनण्याचा विक्रम माजी भारतीय खेळाडू सुरेश रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैनानं वयाच्या 23 वर्षे 197 दिवसांत भारताचं नेतृत्व केलं होतं.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऋषभ पंतनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं.
त्यावेळी त्याचं वय 24 वर्षे 248 दिवस इतकं होतं.
सुरेश रैनानंतर तो दुसरा सर्वात युवा कर्णधार ठरलाय, ज्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलंय.
जेव्हा महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार झाला, तेव्हा त्याचं वय 26 वर्षे 66 दिवस इतकं होतं.
ऋषभ पंत हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार असणारा चौथा विकेटकीपर ठरलाय. यापूर्वी सय्यद किरमाणी, राहुल द्विद आणि महेंद्रसिंह धोनीनं भारतीय संघाचं नेतृत्व केलंय.