महाराष्ट्रातील राजकारणामध्ये (Maharashtra Politics) काहीसे वेगळेपण सध्या पाहावयास मिळत आहे.
शिवसेनेमध्ये मोठी फूट पडून महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि ठाकरे (Shinde and Thackeray Group) असे दोन गट तयार झाले आहेत.
असं असलं तरी कार्यकर्त्यांची निष्ठा ही आपल्या नेत्यांप्रती आणि आपल्या पक्षाप्रती अखंड असते. असंच एक उदाहरण समोर आलं आहे.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मानणाऱ्या एका कट्टर शिवसैनिकाने आपल्या मुलीचं नाव 'शिवसेना' असं ठेवलं आहे.
महाड तालुक्यातील किये - गोठवली येथील माजी उपसरपंच पांडुरंग वाडकर यांनी 17 नोव्हेंबर बाळासाहेबांच्या स्मृतिदिना दिवशीच आपल्या कन्येच्या नामकरण विधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नामकरण सोहळ्याला आजूबाजूच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी आपल्या कन्येचे नावच 'शिवसेना' असे ठेवून सर्वांनाच चकित केले.
पांडुरंग वाडकर यांनी सांगितलं की, बाळासाहेब ठाकरे यांचा मी कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मुलीचे नाव शिवसेना असे ठेवले आहे
या नामकरण सोहळ्याला आजूबाजूच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती.
लवकरच पांडुरंग वाडकर आपल्या कन्येला घेऊन मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते.