भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील चौथा दिवस



महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे...



या यात्रेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत...



सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत..



दरम्यान या यात्रेमध्ये संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय..



आज त्यांची जाहीर सभाही होणार आहे...



नांदेडमधील नायगावातल्या कापशी गुंफा येथेून भारत जोडो यात्रेची उत्साहात सुरुवात झाली.



या यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध घटकातील लोकांना भेटून त्याच्यांशी संवाद साधतायत...



18 नोव्हेंबरला राहुल गांधींची शेगावात होणार मोठी सभा, पाच ते सहा लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता



राहुल गांधींनी आपल्या समस्या सांगण्यासाठी पोतराज, वैदू समाजातील महिला यात्रेत सहभागी



हजारोंच्या जनसमुदयासोबत भारत जोडो यात्रेचं मार्गक्रमण सुरु