काँग्रेस खासदार राहुल गांधी शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांना संसद सदस्यत्व बहाल करण्यात आलं. मंगळवारी राहुल गांधी यांना दिल्लीतील सरकारी बंगलाही पुन्हा देण्यात आला 'संपूर्ण देश माझं घर आहे' अशी प्रतिक्रिया यावेळी राहुल गांधींनी दिली खासदार म्हणून अपात्र ठरल्यानंतर प्रोटोकॉलनुसार राहुल गांधींनी दिल्लीतील अधिकृत निवासस्थान रिकामं केलं होते. राहुल गांधी यांना त्यांचा 12, तुघलक लेन येथीस जुना बंगला दिला आहे. या ठिकाणी राहुल गांधी 2005 पासून राहत होते दिल्लीतील घर सोडताना राहुल गांधी भावूक झाले होते सत्य बोलण्याची किंमत मी चुकवत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती 22 एप्रिलला राहुल गांधीनी बंगला सोडला होता