छोटू दादाचा जन्म 25 नोव्हेंबर 1991 रोजी मालेगावात झाला. युट्यूब स्टार शफीक नाटिया त्याच्या खऱ्या नावापेक्षा 'छोटू दादा' या नावाने जास्त लोकप्रिय आहे. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या 'छोटू दादा'ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. छोटू दादाने 2006 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. छोट्या पडद्यापेक्षा युट्यूबवर छोटू दादाला चांगली लोकप्रियता मिळाली. छोटू दादाची एकूण संपत्ती दोन कोटींच्या आसपास आहे. 'छोटू दादा'च्या व्हिडीओला युट्यूबवर लाखो-कोटी नव्हे तर अब्जावधीत व्ह्युज मिळाले आहेत. लोकप्रिय युट्यूबर शफीक नाटिया त्याच्या विनोदी शैलीतील व्हिडीओमुळे कायम चर्चेत असतो. शफीक नाटियाचा 'छोटू दा के गोलगप्पे' हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याला 1,696,598,521 व्ह्युज मिळाले आहेत. छोटू दादाकडे अनेक महागड्या गाड्या असण्यासोबत स्वत:चं आलिशान घरदेखील आहे.