'उतरन'मध्ये इच्छा ही भूमिका साकारणारी टीना दत्ता सध्या 'बिग बॉस 16' मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. टीना दत्ता 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. शालीन भानोटसोबतच्या त्याच्या रोमँटिक बॉन्डने खूप प्रसिद्धी मिळवली. टीना दत्ता 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. शालीन भानोटसोबतच्या तिच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे तिला प्रसिद्धी मिळली. टीना दत्ता अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. ती काही वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब होती, मात्र 'बिग बॉस'मधून तिनं पुन्हा कमबॅक करत आहे. 'डायन' मधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली टीना ही कोट्यवधींची मालकीण आहे. रिपोर्टनुसार, टीनाची एकूण संपत्ती 65 कोटी रुपये आहे. टीना दत्ता ही बिग बॉसच्या एका एपिसोडचे 8 ते 9 लाख मानधन घेते. टीनानं वयाच्या पाचव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. टीनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. टीना ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.