बॉलिवूडसह, दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रुपेरी पडदा गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. आपल्या क्लासी लूकमुळे पूजा नेहमीच चर्चेत असते. यंदा पूजानं कान्स फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. कान्स रेड कार्पेटवर पूजा हेगडे ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय. पूजा हेगडेनं इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केलेत, जे व्हायरल होत आहेत. पूजाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. पूजा हेगडेचे हे फोटो कान्स फेस्टिवल दरम्यानचे आहेत. पूजा हेगडे प्रिंटेड ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. पूजा तिचा आगामी चित्रपट 'कभी ईद, कभी दिवाली'मुळे चर्चेत आहे. 'कभी ईद, कभी दिवाली'मध्ये पूजा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.