बॉलिवूडसह, दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रुपेरी पडदा गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे आपल्या क्लासी लूकमुळे चर्चेत आहे. यंदा पूजा कान्स फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पूजा हेगडेचा क्लासी लूक पाहायला मिळाला. सध्या पूजाचे लेटेस्ट फोटो चर्चेत आहेत. पूजाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. पूजानं आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हायरल होणाऱ्या क्लासी फोटोंमध्ये पूजा हेगडेनं व्हाइट ऑफ शोल्डर डीप नेक गाऊन वेअर केला आहे. पूजाच्या फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. पूजा तिचा आगामी चित्रपट 'कभी ईद, कभी दिवाली'मुळे चर्चेत आहे. 'कभी ईद, कभी दिवाली'मध्ये पूजा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.