विदर्भात मोठ-मोठ्या नदीवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले पण विदर्भात बंधाऱ्याचे वाटोळे झाले हे सर्वश्रुत आहे. विदर्भात सध्या उन्हाचा पारा 45 पार गेलाय पण या दुष्काळात पूर्णा नदी खळखळून वाहते अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा नदीवर कमी खर्चात बंधारा बांधण्यात आला 2 कोटी रुपये खर्च करून राज्यातील पहिला विदर्भ बंधारा 2021 मध्ये बांधण्यात आला नवीन पद्धतीने बांधलेल्या विदर्भ बंधाऱ्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. या बंधाऱ्यामुळे तब्बल तीन ते चार किलोमीटर पर्यंत पाणी थांबलेले आहे. जानेवारी महिन्यात आटून जाणारी ही पूर्णा नदी यावर्षी भर उन्हाळ्यात भरभरून वाहत आहे. नदीलगतच्या परिसरातील भूजल पातळी वाढल्याने शेतकऱ्यांना ओलिताकरिता याचा फायदा