विदर्भात प्रसिद्ध श्री क्षेत्र बहिरममध्ये सध्या यात्रा सुरु आहे.. विदर्भातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आली असून येथे हजारो भाविकांची गर्दी उसळत आहे. गुलाबी थंडीत गरम हंडीवर ताव मारण्यासाठी येणाऱ्या खवय्यासह भाविकांच्या गर्दीने यात्रा परिसर गजबजून गेला आहे. गेल्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच यात्रेला भव्य स्वरूप आले आहे. भाविक जिथे जागा मिळेल तेथे रोडगा पार्टीचा आनंद घेत असून हंडीत शिजवलेल्या मटणाची चव चाखण्यासाठी खवय्येही हजेरी लावत आहेत. या वर्षी या सगळ्यात मोठ्या यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले असून पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. बहिरम यात्रेत दरवर्षी रिंगण सोहळा आयोजित केला जातो यात्रेचं मनमोहन दृष्य टिपलं आहे परतवाडा येथील फोटोमित्रा स्टुडिओनी