पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आनंद आज द्विगुणित झालाय



कारण सात वर्षांपासून दुरावलेली त्यांची दोन्ही मुलं आज त्यांना भेटलीत



पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर सात वर्षानंतर आज भगवांत मान आपल्या मुलांना भेटले



मान यांची दोन्ही मुले अमेरिकेला राहतात



आपल्या वडिलांच्या शपथविधीसाठी खास अमेरिकेवरून आज पंजाबला आली



भगवंत मान यांची मुलगी सीरत कौर (21 वर्षे) आणि मुलगा दिलशान 17 वर्षाचा ही दोन्ही मुलं शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.



तब्बल सात वर्षानंतर आपल्या मुलांना पाहून भगवंत मान भावूक झाले.



कामामुळे आपल्या मुलांना भेटता येत नाही ही खंत भगवंत मान यांनी अनेक वेळा व्यक्त केली.



भगवंत मान यांच्यासाठी हा दिवस स्पेशल असणार आहे