मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर आता एक जुनी मुलाखत समोर आली आहे.

या मुलाखतीमध्ये मलायकाने अरबाजशी लग्न का केले हे तिने स्वतः सांगितले आहे.

साजिद खानच्या चॅट शोमध्ये अभिनेता अनिल कपूर, अर्जुन रामपाल, मलायका अरोरा आणि अरबाज खान हे पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

शोमध्ये अनिल कपूरने मलायका अरोराला विचारले, की सलमान खान आणि अरबाज खान यांच्यामध्ये कोण जास्त सुंदर दिसते.

या प्रश्नावर मलायका म्हणते, 'माझा नवरा अरबाज खान दिसायला चांगला आहे यात शंका नाही.

अरबाज दिसायला चांदला असल्यामुळेच मी त्याच्याशी लग्न केले आहे, असे मलायकाने सांगितले.

अरबाजला गंभीर स्वभावाचे लोक आवडतात. शिवाय तो खूप रोमँटिक आहे, असे मलायकाने सांगितले.

मलायका सांगते, तो अनेकदा म्हणतो की, आम्ही एकत्र वृद्ध होत आहोत. मलाही त्याच्यासोबत स्वत:ला म्हातारे होताना बघायला आवडेल.

हेच आमच्या प्रेमाचं कारण आहे, असे मलायकाने सांगितले.