हरपाल सिंह चीमा नाभामध्ये राहतात. ते वकील आहेत. हरपाल सिंह चीमा दिडबा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदार झालेत. त्यांनी पंजाब विद्यापीठात विद्यार्थी नेता म्हणूनही कारकीर्द गाजवली आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.

डॉ. बलजीत कौर या मान यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला चेहरा आहेत डॉ. बलजीत कौर. त्यांनी मलौत विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. डॉक्टर बलजीत कौर फरीदकोटचे माजी खासदार साधू सिंह यांच्या कन्या आहेत. त्या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत.

हरभजन सिंह ईटीओ यांनी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. हरभजन सिंह वकील आहेत.

डॉ. विजय सिंगला मानसा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांचा पराभव केला. डॉ. विजय सिंगला हे डेटिस्ट आहेत.

पठानकोटचे रहिवासी असलेल्या लालचंद यांनी भोज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.

गुरमीत सिंह मीत हेयर बरनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गुरमीत सिंह इंजिनिअर आहेत.

Kuldeep Singh Dhaliwal : कुलदीप सिंह धालीवाल यांनी अजनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. कुलदीप यांचा परिवार काँग्रेसशी संबंधित होता.

लालजीत सिंह भुल्लर यांनी पट्टी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. त्यांचं शिक्षण 12 वीपर्यंत झालं आहे.

ब्रह्म शंकर शर्मा यांनी होशियारपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ब्रह्मशंकर बारावीपर्यंत शिकले आहेत

हरजोत सिंह बैंस हे आम आदमी पार्टीकडून आनंदपूर साहिब मतदारसंघातून निवडून आले. ते वकील आहेत, त्यांचं शिक्षण बीए एलएलबीपर्यंत झालं आहे.