महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं घराणं म्हणजे पवार घराणं.

Published by: जगदीश ढोले

याच पवार घराण्यात लवकरच नव्या सुनेचं आगमन होणार आहे.

शरद पवारांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र.

लवकरच युगेंद्र पवार आजोबा शरद पवारांच्या आशीर्वादानं आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहेत.

युगेंद्र पवार तनिष्का प्रभूसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत, नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडला.

जाणून घेऊया, पवारांची नवी सून नेमकी आहे तरी कोण?

युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव तनिष्का प्रभू.

तनिष्का यांचं शिक्षण परदेशात Finance मध्ये झालंय.

तनिष्का प्रभू या मुंबईच्या रहिवासी आहेत.

समाजकारणापाठोपाठ राजकारणातही सक्रिय झालेले युगेंद्र पवार लवकरच नव्या रोलमध्ये पहायला मिळणारेत

लवकरच संसाराची नवी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येणारेय

एकूणच फायनान्समध्ये शिक्षण घेतलेल्या या दोघांनीही आता नव्या आयुष्याची बॅलन्सशीट टॅली केलीये.