मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या कुंडमळा पूल कोसळून रविवारी अनेक पर्यटक वाहून गेले होते.

Published by: जगदीश ढोले
Image Source: PTI

हा पूल कोसळला तेव्हा याठिकाणी तब्बल 100 पर्यटक उपस्थित असल्याची माहिती आहे.

Image Source: PTI

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) कालच्या बचावकार्यात 51 जणांना नदीतून बाहेर काढले होते.

Image Source: PTI

यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Image Source: PTI

त्यांच्यावर सध्या पवना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

Image Source: PTI

तर उर्वरित लोक किरकोळ जखमी झाले होते.

Image Source: PTI

तळेगाव दाभाडे मधील मायमर रुग्णालयात 10 जणांना उपचारासाठी ठेवण्यात आल होत.

Image Source: PTI

त्यातले दोघे आयसीयूमध्ये होते. बाकी रुग्णांना किरकोळ इजा होती त्यांना रात्रीच घरी सोडण्यात आले.

Image Source: PTI

तळेगाव दाभाडेतील अथर्व रुग्णालयात 17 जणांना उपचारासाठी आणण्यात आले होते.

Image Source: PTI

त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र, काल पुलावरुन (Kunjmala bridge) पडलेले आणखी किती जण बेपत्ता आहेत,

Image Source: PTI

याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.

Image Source: PTI

एनडीआरएफकडून सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बचावकार्याला सुरुवात झाली आहे

Image Source: PTI