पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठचा थाट! पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटेपासून गणेशभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. राज्यभरातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात देशभरातील सुप्रसिद्ध अशा मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून तयार केली जाते. आणि याच मंदिराच्या गाभाऱ्यात गणेशोत्सवा दरम्यान बापांची मूर्ती विराजमान होत असते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे 132 व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.