सध्या पुण्यामध्ये सिंहगड रस्तावर तुफान ट्राफिक जाम पाहायला मिळाले.

या ट्राफिक मुळे पुणेकर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

आपल्या ठिकाणावर पोहचण्यासाठी पुणेकरांना या ट्राफिकचा सामना करत पोहोचवे लागत आहे.

या जबर ट्राफिकमध्ये प्रवासी यांना तब्बल चार तास अडकून राहवे लागले आहे.

या ट्राफिक मध्ये चक्क 6 किलोमीटर पर्यंत लाबंची लांब रांग पाहायला मिळाली.

या ट्राफिकचे मुख्य कारण म्हणजे कोथरूड, कर्वेनगरकडे जाणारा पुल दुरूस्तीसाठी बंद असल्या कारणामुळे ही ट्राफिक झालेली आहे अशी माहिती मिळाली आहे.

ट्राफिकच्या समस्यांसाठी लवकर दुसऱ्या मार्ग सुरू करवा अशी पुणेकर नागरिकांकडून करण्यात आली आहे.

तर या सिंहगड ट्राफिकच्या समस्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.

सिंहगडच्या उड्डाण पुलाचे काम पुर्ण झाले आहे परंतू भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्घाटनासाठी वेळ नसल्या कारणामुळे उड्डाण पुलाचे काही काम अपूर्ण ठेवले आहे.

असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.