वानवडी पोलीस उपायुक्तांनी अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचविले. वानवडीमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास जगताप चौकात लोकांची गर्दी जमली होती. यावेळी कारने दुचाकी स्वाराला धडक दिल्यानंतर एक दुचाकी स्वार फिट येवून रस्त्यावर पडला होता. वानवडीमध्ये पोलीस उपायुक्तांनी फीट आलेल्या तरुणांवर प्रथमोपचार करत त्याचा जीव वाचवला. त्याचवेळी रस्त्याने जाणारे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी तरुणाचे प्राण वाचविले. पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे हे पुणे शहर पोलीस दलात पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. रस्त्यावर झालेल्या अपघाताला तात्काळ मदत पोहोचवत त्यांनी तरुणाचे प्राण वाचवले यानंतर नागरिकाकडून पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांचे कौतुक होत आहे.