पुणे येथे आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव कार्यक्रमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती होती.

Published by: जयदीप मेढे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी समाधी मंदिरात विधिवत पूजा केली व आशीर्वाद प्राप्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी दौऱ्यावर आले असतांना त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले गेले.

संस्थानच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव कार्यक्रम येथे 'नमो ज्ञानेश्वरा' या ग्रंथाचे प्रकाशन आणि याच ग्रंथाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही केले.

यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त, पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.