सायंकाळ म्हटलंकी मनात शांत, निवांत अशाच फिलिंग्स येतात. अशीत सायंकाळ आज पुण्यात होती. आज पुणेकरांनी पाहिलेली सायंकाळ ती कोणत्या सुंदर चित्रापेक्षा कमी नव्हती. अगदी स्वप्नवत अशा या सायंकाळचे फोटो नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पुण्याने वेगवेगळ्या रंगाची चादर ओढल्याचं दिसून येत आहे. कुठे गुलाबी, कुठे केशरी अशी रंगबीरंगी सायंकाळ मनाला मोहणारी आहे. पुण्यातील विविध भागातील हे फोटो आहेत. कुठे इमारतींनी तर कुठे रस्ता फोटोंत दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे ही सायंकाळ इतकी सुंदर दिसूत आहे. पुण्यासह पालघरमधील काही फोटोही समोर आले असून यामध्येही अशीच सायंकाळ आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया)