सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप, पगारवाढीसह नव्हे तर लोकांसाठी संप



सार्वजनिक बँकाच्या खासगीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून दोन दिवसांचा संप पुकारला



देशातील सार्वजनिक बँकांचे कर्मचारी गुरुवारी आणि शुक्रवारी संपावर आहे



या संपामुळे बँकांमधील दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने संपाची हाक दिली आहे.



महाराष्ट्रासह देशभरात या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.



अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली होती. आता सरकारने त्यादृष्टीने वेगाने तयारी सुरू केली आहे.



याशिवाय सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे.