अजय देवगन यांनी जुहूमध्ये घर घेतले आहे. या घराची किंमत 60 कोटी रूपये आहे. चंडीगढमधील पंचकुला येथे आयुष्मानने एक घर खरेदी केले आहे. या घराची किंमत 9 कोटी आहे. 2021 मध्ये घर खरेदी करणाऱ्या कलाकारांच्या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव देखील आहे. अमिताभ यांनी मुंबईमध्ये ओशिवारा येथे 31 कोटी रूपयांचे डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. अमिताभ यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षरकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जाह्नवी कपूरने मुंबईमधील जुहू येथे आलिशान घर घेतलं आहे. एका रिपोर्टनुसार, जाह्नवीच्या नव्या घराची किंमत 39 कोटी आहे. अभिनेता ऋतिक रोशनने जुहू वर्सोवा लिंक रोड येथे तीन पेंट हाऊस खरेदी केले आहेत. या पेंट हाऊसची किंमत जवळपास 100 कोटी रूपये आहे.