माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील
पण माणूस हा गेलेली केस नसावा



खरं तर सगळेच कागद सारखेच फक्त त्याला अहंकार चिकटला
की त्याचं सर्टिफिकेट होतं



माणूस निरुत्तर झाला तरी हरकत नाही पण निष्प्रश्न झाला की संपलाच



जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते



माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे…



भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि
रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो



परिस्थिति हा अश्रूंचा कारखाना आहे!



प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे



आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे…



शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो
बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.