इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटवरुन जोनास आडनाव काढून टाकण्याबाबत काय म्हणाली प्रियांका?

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा गायक-गीतकार निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकली असून तिने मागील महिन्यात एक धक्कादायक निर्णय घेतला होता.

या निर्णयामुळे प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.

प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून जोनास आडनाव काढून टाकले.

त्यामुळे प्रियांका आणि निकच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावत आहेत. अखेर प्रियांकाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

यावर स्पष्टीकरण देत प्रियांका म्हणाली, माझ्या ट्विटरच्या वापरकर्ता नावाला माझे नाव जुळले पाहिजे.

म्हणून मी असे नाव ठेवले आहे.

लोकांसाठी ही एवढी मोठी समस्या का बनली आहे याचे मला आश्चर्य वाटते.

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स' 'The Matrix Resurrections' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचे नुकतेच एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. 'द मॅट्रिक्स' च्या चौथ्या भागात प्रियांका 'सती'ची भूमिका साकारणार आहे.

Thanks for Reading. UP NEXT

लाखो दिलांची धडकन... रश्मिका मंदाना!

View next story