राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीच्या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.



आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणाची विधानसभेत चर्चा झाली. यावेळी आरोपीच्या कर्नाटक संबंधावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली.



विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदित्य ठाकरे धमकी प्रकरणातील आरोपीला बंगळुरूमधून अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली.



आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याचे त्यांनी म्हटले.



तत्पूर्वी, विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा मांडला. आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या आरोपींचा संबंध कर्नाटकशी असल्याच्या कारणाने महाविकास आघाडी आणि भाजप आमदारांमध्ये खडाजंगी झाली.



आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई सायबर पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी म्हटले की, आरोपी हा कर्नाटक मध्ये सापडला आहे.



डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांची हत्येचे धागेदोरे कर्नाटकमध्ये आहेत.



या प्रकरणाचे काही धागेदोरे आहेत का, याचा उहापोह झाला पाहिजे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याचा मुद्दा प्रभू यांनी मांडला.



राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीदेखील या मुद्यावर विधानसभेत आपली भूमिका मांडताना भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.



Thanks for Reading. UP NEXT

रणवीरच्या लूकची जोरदार चर्चा!

View next story